बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं”

मुंबई | इतर राज्यात काही आपत्ती आली की बॉलिवूड कलाकार मदत करतात. मात्र महाराष्ट्रात पूर आला तर साधं ट्विटही नाही. माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा, असं आवाहन मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूडच्या कलाकारांना केलं आहे.

माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावसं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदत कार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटत आहेत… अशा वेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड तार्‍यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे.

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कुठं दरड कोसळली, तर कुठं पूराचं पाणी थेट घरांमध्ये घुसलं. त्यामुळे अनेक लोक बेघर झालेत. या पूरग्रस्त कोकणवासीयांची सध्याची गरज ओळखून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 हजार सोलापूरी चादरी कोकणाला पाठवल्या आहेत. सोलापूरातून 1 हजार चादरी कोकणला रवाना झाल्या आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने या एक हजार सोलापुरी चादरींची मदत कोकणला देण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

भारताला मोठा धक्का, सानिया-अंकिताची जोडी पहिल्याच फेरीत बाहेर

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही’; अजित पवार भडकले

कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही तर…- भरत जाधव

भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचला; कोल्हापुरातील धक्कादायक व्हिडीओ समोर

डोक्यावरचं छप्पर उडालेल्या कोकणी बांधवांसाठी राज ठाकरेंकडून 1 हजार सोलापुरी चादरी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More