बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”

मुंबई | मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज एक खास ट्वीट केलंय. त्यांचं हे ट्वीट आता चर्चेला विषय ठरलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे चक्क टी-शर्ट, जॅकेट आणि जीन्समध्ये दिसत आहेत. तसेच अमेय खोपकर यांनी या फोटोला दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.

माझ्या महाराष्ट्रात राजकारण्यांचे सत्तेसाठी सुरु असलेले किळसवाणे ‘प्रताप’ बघितले की पुन्हा एकदा खात्री पटते… मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….हे वाक्य कानावर पडेल, तो दिवस महाराष्ट्राच्या भवितव्यातील सर्वात सुवर्ण दिवस असेल, असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलंय.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा दावा सरनाईक यांनी केलाय. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खोपकर यांनी हे ट्वीट केलं आहे.

दरम्यान, सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावाही सरनाईक यांनी आपल्या पत्रात केला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक बातमी! एकदा कोरोना होऊन गेल्यावर दुसऱ्यांदा संक्रमणाचा धोका कमी

कोरोना काळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले- विजय वडेट्टीवार

‘फादर्स डे’ निमित्त रियानं मागितली वडिलांची माफी, म्हणाली….

मोठी बातमी! ‘या’ माजी मंत्र्याला अटक, महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

सरनाईकांच्या लेटरबॉ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More