बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोलेंना कोरोनाची लागण

मुंबई | मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेय घोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. पुढील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची फोनवरुन चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना याबद्दलची माहिती दिलीये.

अमेय घोले यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सावध केलंय. गेल्या तीन ते चार दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपापली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन घोले यांनी केलंय. सर्वांचे आशीर्वाद, सदिच्छा आणि प्रेमाच्या बळावर मी लवकरच बरा होऊन पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होईन, असा विश्वासंही त्यांनी व्यक्त केलाय.

मुंबई हा कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला होता. गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात पालिकेने कोरोनावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्थेची उभारणी केली.

महत्वाच्या बातम्या-

‘आता सहन होत नाही, मी बोलणारच’; अनुराग कश्यपने कंगणाला झापलं

“लॉकडाऊन करून शहरातील कोरोना नियंत्रणात येईल का?, पालकमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं”

शेतकरी महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू, दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका- सुनील केदार

सिनेमातील नट-पुढाऱ्यांना रायगडावर महाराजांचं जवळून दर्शन, शिवभक्तांना का नाही?- संभाजीराजे

अण्णा हजारेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला हसन मुश्रीफ यांचं उत्तर; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More