“शेवटच्या आमदाराला सुद्धा ऑफर देण्यात आली होती पण, बाबा ओरडतील म्हणून नाही आला”
मुंबई | सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेतील आमदारांची संख्या कमी होत आहेत. शेवटच्या आमदाराला सुद्धा शिंदेगटाकडून ऑफर देण्यात आली होती पण बाबा ओरडतील म्हणून नाही आला, असं खोचक टोला नवनिर्माण सेनेचे नेते (MNS) अमेय खोपकर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
आज एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक आठवडा पूर्ण झाला. 13 आमदारांसोबत सुरू झालेलं हे बंड आता 50 आमदारांपर्यत जाऊन पोहचलं आहे. काल उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री ही शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. ते पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करतील.
गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या शिवसेनेतील दोन तृतीयांश आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमची असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय. शिंदे गटात असलेले आमदार मुंबईत आल्यानंतर पुन्हा शिवसेनेत येतील असा दावा सातत्याने शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या सगळ्यात मनसे मध्यस्थी करणार अशी चर्चा सुरू होती. यावर मनसेचे शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांनी स्पष्टीकरण दिलं. सध्या राज्याचं मुख्यमंत्री कोण राहिल हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुर्तास आम्ही वेच अँन्ड वाॅच च्या भूमिकेत आहोत, असं ते म्हणालेत.
थोडक्यात बातम्या
“हवा, पाणी, डोंगर, हॉटेल आपल्या राज्यातही आहे, या इकडे”
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन
“राज्यातील हालचाली पाहता काहीही घडू शकतं, त्यामुळे…”
‘मरण आलं तरी बेहत्तर पण…’; एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट चर्चेत
‘जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर…’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य
Comments are closed.