महाराष्ट्र मुंबई

“पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई?”

मुंबई | पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार?, अशी जहरी टीका मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली आहे.

महापालिकेचा ‘वरुण’ गोंधळ आतून तमाशा सुरु आहे. आम्ही मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा पर्दाफाश करणारच, असा घणाघात अमेय खोपकर यांनी केलाय.

संदीप देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 24 तासात स्पष्टीकरण द्या, असं आव्हान देतो. स्पष्टीकरण द्यायची हिंमत आहे का?, असा सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको- मायावती

विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला

…तेव्हा गप्प का?, पडळकरांवरुन राष्ट्रवादी राजकारण करत आहे- देवेंद्र फडणवीस

अ‍ॅमेझॉनकडून मोठी घोषणा, भारतात ‘इतक्या’ हजार नोकऱ्या उपलब्ध करणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या