“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशाप्रकारचे संस्कार केलेत?”
मुंबई | वंचित बहूजन आघाडीचे नेते व प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सुजात आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केलेल्या टीकेला मनसेकडून (MNS) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर राज ठाकरेंनी बहूजन मुलांच्या आधी स्वत:च्या मुलाला रस्त्यावर उतरवावं. तर दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्गीय ब्राम्हण असतात, असं वादग्रस्त वक्तव्य सुजात यांनी केलं होतं. या टीकेला मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रकाश आंबेडकरांकडून सुजातवर काय प्रकारचे संस्कार झालेत?, असा खोचक सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे. तर मुलाला जातीपातीचं राजकारण शिकवू नका, असा सल्ला अमेय खोपकर यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.
दरम्यान, मुलगा चांगला बोलतोय, राजकारणात पुढे येईल. मात्र, जातीपातीचं राजकारण सुजातला शिकवू नका. अशा प्रकारचे संस्कार मुलाला देऊ नका, असा सल्ला देखील अमेय खोपकर यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोदी-बायडन यांच्यात वर्च्युअल बैठक; रशिया-युक्रेन युद्धाबाबत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
“लोकांना कायद्यापासून पळू नका म्हणणारेच आता #*# पाय लावून पळतायंत”
पाकच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्गीय ब्राम्हण असतात”
“भाजपचं हिंदुत्व मतलबी आणि तकलादू असल्याचं आता स्पष्ट झालंय”
Comments are closed.