मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या भाषणातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवर सडकून टीका केली. यानंतर राज ठाकरे विरूद्ध राष्ट्रवादी (NCP) असा वाद रंगलेला पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंना रामदास पाध्येंच्या अर्धवटरावाची उपमा दिली आहे. मुंडेंच्या या टीकेचा मनसेचे अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या तात्या विंचूचा ओम फट स्वाहा करणार आहेत, असा इशारा अमेय खोपकर यांनी ट्विट करत दिला आहे. तर राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरूवात केली आहे. लवकरच तुमचा थरथराट होणार. लवकर बरे व्हा धनंजय मुंडे, असा टोलाही खोपकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी देखील धनंजय मुंडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ‘बॉबी डार्लिंग’ आहे, अशी बोचरी टीका योगेश चिले यांनी केली आहे.
अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत.
राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार.
Get Well Soon धनंजय मुंडे— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 20, 2022
थोडक्यात बातम्या-
Russia-Ukraine War| रशियाचं युक्रेनियन सैन्याला अल्टिमेटम
किरीट सोमय्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पुत्रालाही न्यायालयाचा मोठा दिलासा
राणू मोंडल झळकणार ‘या’ सुपरस्टारसोबत, नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल
“भाजपला पाच हजार वर्षांचा हिंदुत्त्वाचा इतिहास आहे”
‘ते’ वक्तव्य संजय राऊतांच्या अंगलट येणार?, न्यायालयात याचिका दाखल
Comments are closed.