‘आपल्याकडे आयुष्यात दोन…’; ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन कपूरची पोस्ट व्हायरल

Malaika Arora

Arjun Kapoor | अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) दोन महिन्यांपासून ते एकमेकांपासून दूर राहत असल्याचंही म्हटलं गेलं. आता पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चेनी जोर धरला आहे. त्यांनी आपलं नातं तोडल्याची देखील जोरदार चर्चा झाली. अखेर या सर्व बातम्यांवर मोठा खुलासा झाला आहे.

अर्जुन कपूरची पोस्ट व्हायरल

अर्जुनने भूतकाळ आणि भविष्याविषयी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा या दोघांचं नातं चर्चेत आलं आहे. अर्जुनने आपल्याकडे आयुष्यात दोन पर्याय असल्याचं स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

शनिवारी अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. ‘आपल्याकडे आयुष्यात दोन पर्याय असतात. आपण आपल्या भूतकाळाचे कैदी होऊ शकतो किंवा भविष्यातील शक्यतांचा शोध घेणारे बनू शकतो’, अशा आशयाची ही पोस्ट आहे.

मलायकाच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

यावेळी मलायका ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चांगलीच भडकली. तिच्या मॅनेजरने हे वृत्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं. काही मीडिया रिपोर्टनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर खरोखरच वेगळे झाले आहेत का, असे मॅनेजरला विचारण्यात आले. यावेळी मॅनेजरने हे वृत्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मलायकाच्या मॅनेजरने सांगितलं, “नाही नाही, या सर्व केवळ चर्चा आहे. त्या दोघांचं ब्रेकअप झालेलं नाही. मलायकाने अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं होतं. 19 वर्षांच्या संसारानंतर मलायका आणि अरबाज यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.

मलायका (Malaika Arora) आणि अर्जुन यांचं नातं अजूनही मजबूत असून ते दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात.त्यांच्यात कोणताही गैरसमज नाही, असं मलायकाच्या मॅनेजरने म्हटलं असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय. मात्र, अजूनही माध्यमांमध्ये त्यांच्या वेगळं होण्याच्या चर्चा सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

बीडची जागा कोण जिंकणार?; एक्झिट पोल्सचा आश्चर्यकारक अंदाज

पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वाराला उडवलं; पुढं जे झालं ते..

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार; वाचा एक्झिट पोलचा अंदाज

पुण्याची जागा कोण जिंकणार?, सर्वच्या सर्व एक्झिट पोलमध्ये आलं एकच नाव

देशात भाजपला किती जागा मिळणार?, प्रशांत किशोर यांचा नवा धक्कादायक अंदाज

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .