मनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीवर डॉक्टरांचा मोठा खुलासा

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासाठी त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना करोना झाल्याचं सांगितलं आहे. हलका ताप आणि श्वास घेण्यास अडचण अशा सौम्य प्रकारची लक्षणं बच्चन यांना आढळून आली असल्याची माहिती आता डाॅक्टरांकडून मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. सध्या काळजी करण्याचं कारण नाही. त्यांना आताच व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज नाही, असंह नानावटीमधल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चनलाही कोरोनाची लागण झाली आहे. खासदार जया बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि मुलगी आराध्या यांचे कोरोना अहवाल मात्र निगेटीव्ह आले आहेत.

अमिताभ बच्चन यांचे इतर नातेवाईकांच्याही कोरोना चाचण्या घेण्यात आल्याची माहितीही नुकतीच समोर आली आहे. या व्यतिरिक्त त्यांच्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांचे देखील स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. त्यांचेही अहवाल लवकरच येणार आहेत.

 

“आम्ही आमच्या संपूर्ण स्टाफला विनंती केली आहे की त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. तसंच आमच्या कुटुंबीयांनीही करोना चाचणी करावी. सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहनही मी करतो.” असं अभिषेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!

अमिताभ यांच्या पाठोपाठ अभिषेकचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

परवा गलवान खोऱ्यामध्ये बंदूक वापरली नाही ‘तो’ आम्ही केलेल्या कराराचा भाग- शरद पवार

आपले शेजारी आपल्याच विरोधात, बिघडलेले संबंध अलीकडच्या काळातील योगदान; पवारांचा हल्लाबोल

“मला मोदींचा गुरू म्हणून उगीच त्यांना अडचणीत आणू नका”

या देशाची अर्थव्यवस्था वाचवायला मनमोहन सिंगांसारख्या व्यक्तीची गरज- शरद पवार

केंद्राने आपलं दुकान चालवण्यासाठी….., शरद पवार यांचं रोखठोक मत

मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप, म्हणाले, आमचा विद्यार्थी पास झालाय!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या