बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार?; ‘या’ तीन नावाची जोरदार चर्चा

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा (Speaker of the Legislative Assembly) राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली नाही. तसेच यापुर्वी हंगामी अध्यक्ष बसवून महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलं. त्यात मोठा गोँधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आगामी अधिवेशनात आता अध्यक्ष असणार का?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात होता.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसेचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीचा दौरा केला होता. त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचं नाव निश्चित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. अशातच आता काँग्रेसमधून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तीन नावं पुढं येताना दिसत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचं नाव चर्चेत आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) आणि मुंबईचे आमदार अमिन पटेल (Amin Patel) यांचं नाव देखील चर्चेत आहे. मागील विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्यांच्या नावावर संमती झाली नव्हती. अशातच आता नाना पटोले यांनी दिल्लीत दौऱ्यावर अध्यक्षपदासाठीचं नाव निश्चित केल्याची देखील चर्चा आहे.

दरम्यान, थोपटे हे वाघासारखे असून त्यांनी अडकून न राहत कायम मैदानात राहावे, अशी आपली इच्छा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता संग्राम थोपटे यांची वर्णी लागणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कंपनीच्या फोनचा मोठ्ठा स्फोट, ब्रँडचं नाव ऐकाल तर धक्काच बसेल

अवकाळी पावसाचा राडा, त्यातच हवामान खात्याकडून ‘या’ मोठ्या संकटाचा इशारा

कोणता झेंडा घेऊ हाती?, एक-दोन नव्हे तर ‘या’ नेत्याने केलं पाचव्यांदा पक्षांतर

महाराष्ट्रातील ‘या’ शहराचं टेंशन वाढलं, नायजेरियातून आलेल्या मायलेकी पॉझिटीव्ह

“मी मेल्यानंतर…..” सर्वांना हसवणाऱ्या कुशल बद्रिकेची भावनिक पोस्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More