पुणे | पुण्यातील ‘एबीआयएल’चे सर्वोसर्वा अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर बुधवारी (ता.१०) ईडीने छापा मारला होता. FEMA कायद्यांतर्गत चौकशी करण्यात आली आहे. ६ वर्षापूर्वीचे परकीय चलन प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ED) काल दिवसभर त्यांची चौकशी केली. त्यानंतर अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांना ED ने रात्री चौकशीकरिता ताब्यात घेतले. पुढील चौकशीकरता अमित भोसलेंना पुण्यातून मुंबईला नेल्याचे सांगण्यात येत आहे.
अविनाश भोसले यांच्या विद्यापीठ रोडवरील एबीआयएल कार्यालयात EDच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ८:३० वाजता धाड टाकली. अविनाश भोसले यांच्या विदेशी बँकेच्या खात्यावर पाचशे कोटी जमा आहेत. अंमलबजावणी संचलनालयाला (ED) संशय आहे की ही रक्कम आयबीच्या परवानगीशिवाय खात्यावर जमा आहे.
अविनाश भोसले यांची मुलगी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. स्वप्नाली कदम ह्या काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी आहेत. अद्याप तरी त्यांनी या नोटीसवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, संगमनेर शहरातून अविनाश भोसले रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होते. 80च्या दशकात ते रिक्षा चालवत होते. त्यानंतर रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय ते करु लागले. अविनाश भोसले यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी झाली, त्यानंतर ते रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटं घेऊ लागले, त्यानंतर रिक्षावाला ते रियल इस्टेट किंग असा अविनाश भोसले यांचा थक्क करणारा प्रवास आहे.
थोडक्यात बातम्या –
धक्कादायक…. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप
बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचं महत्त्वाचं पाऊल
भाजप खासदार असताना मोदींशी पंगा; आता ‘या’ काँग्रेस नेत्याचं थेट वाराणसीत आव्हान!
5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता!
भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी
Comments are closed.