बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर NCB ला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले; वानखेडेंच्या जागी ‘या’ अधिकाऱ्याची वर्णी

मुंबई | समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना एनसीबी मुंबईच्या विभागीय संचालक (Zonal Director) पदावरून हटवल्यानंतर एनसीबी मुंबईची (NCB Mumbai) धुरा कोणत्या अधिकाऱ्याकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर एनसीबी मुंबईला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले आहेत.

2008च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित घावटे (Amit Ghavte) यांची एनसीबी मुंबईच्या विभागीय संचालक पदी नियुक्ती झाली आहे. एनसीबीच्या केंद्रीय कार्यालयाकडून एक पत्रक जारी करत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. अमित घावटे यांच्याकडे बंगळुरू झोनल युनिटचा अतिरिक्त कारभार देखील असणार आहे.

मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर (Cordelia Cruise) कारवाई केल्यानंतर समीर वानखेडे व एनसीबी मुंबई चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यामुळे कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपासाचं अमित घावटे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन केलं असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा (Aryan Khan Drugs Case) काहीही संबंध नसल्याचं एनसीबी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सुजात आंबेडकर राजकारणात येणार?, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

‘तुम्ही राज्य चालवताय, का हजामत करताय?’, राजू शेट्टी संतापले

पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे दर

रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख नीतू कपूरने केली जाहीर, पाहा व्हिडीओ

धनंजय मुंडेंचा रूग्णालयातील पहिला फोटो समोर, पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More