बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेला मोठा धक्का; विद्यमान आमदारच राष्ट्रवादीच्या गळाला???

मुंबई | ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. अमित घोडा पालघर विधानसभेचे आमदार आहेत.

अमित घोडा हे नाराज असल्यानं त्यांनी शिवबंधन सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. पालघर पोटनिवडणुकीत अमित घोडा यांनी राजेंद्र गावीत यांचा पराभव केला होता. आता विधानसभेत त्यांना उमेदवारी दिली नसल्याने ते पक्षावर नाराज झाले आणि म्हणूनच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला अनेक धक्के बसत होते. अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडून गेले. मात्र आता वार फिरल्याचं दिसतंय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करणार असताना शिवसेनेच्या माजी आमदाराने नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. औरंगाबादमधील गंगापूर-खुलताबाद विधानसभेचे दहा वर्ष शिवसेनेचे आमदार राहिलेले अण्णासाहेब माने आणि त्यांचे चिरंजीव संतोष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More