मुंबई | राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांना राजकारणात आणण्याची मनसे पदाधिकाऱ्यांची मागणी राज यांनी मान्य केल्याचं नुकतंच समोर आलं होतं. आता मराठवाडा दौऱ्यापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात होणार असल्याचं कळतंय.
मनसे प्रमुख राज ठाकरे 19 जुलै पासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. 8 जिल्ह्यांच्या या दौऱ्यात राज यांच्यासोबत अमित ठाकरेही सहभागी होणार असल्याचं कळतंय. 23 जुलैला औरंगाबादमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे.
अमित ठाकरेंच्या राजकीय सक्रियतेसोबतच मनसेला नवं बळ देण्याचा राज यांचा प्रयत्न असेल. त्याची सुरुवात मराठवाड्यातून होणार असल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…
-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन
-धक्कादायक!!! ‘बिग बॉस मराठी’मधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर???
-उद्धव ठाकरेंचे आदेश झुगारुन 6 आमदारांची बैठकीला दांडी?
-एखाद्या मालिकेमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती कमी होत नाही- राहुल गांधी