Top News देश

“शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट फक्त 21 हजार 900 कोटी, तर मोदींच्या काळात…”

नवी दिल्ली | यूपीएच्या काळात शरद पवार कृषीमंत्री असताना कृषी क्षेत्राचं बजेट हे फक्त 21 हजार 900 कोटी रुपयांचं होतं. मोदी सरकारच्या काळात कृषी क्षेत्राचं बजेट हे तब्बल 34 हजार 399 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा केला. मात्र याआधी गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर निशाणा साधला.

यूपीए सरकराने 10 वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचं 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. तर मोदी सरकारने आतापर्यंत 95 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं असल्याचं शहा म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान हे शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत. कोणीही एमएसपी व्यवस्था किंवा शेतकऱ्यांची जमीन त्यांच्यापासून हिसकावून घेणार नाही. सरकार मनापासून शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही अमित शहांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात मनसेचं खळखट्याक; महाराष्ट्रातील पहिलं ॲमेझॉन फुटलं

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचं काम- देवेंद्र फडणवीस

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या