देश

कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? समजेल 23 तारखेला- अमित शहा

कोलकाता |  कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? हे 23 तारखेला समजेलस, असं म्हणत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका यांना मोदींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

प्रियांकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटलं म्हणजे कोणीही दुर्योधन होत नाही. त्यामुळे 23 तारखेला कळेल कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन?, असं अमित शहा म्हणाले आहेत.

प्रियांका गांधी यांनी मोदींना दुर्योधनाची उपमा देत ‘अहंकारी’ असं संबोधलं होतं. त्यांच्या या टीकेला आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राजीव गांधीवर मोदींनी केलेल्या या टीकेवरुन राजकारणात चांगलाच गदारोळ सुरु आहे. हे टीकेचं सत्र कधी संपणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-देश अशा अहंकाराला माफ करणार नाही; प्रियांका गांधींचा पुन्हा मोदींवर पलटवार

-माझा जावई माझंही ऐकत नाही आणि उद्धव ठाकरेंचही ऐकत नाही- रावसाहेब दानवे

-‘जय श्रीराम’च्या घोषणा भारतात नाहीतर पाकिस्तानात द्यायच्या का?; अमित शहांचा ममतादीदींना सवाल

-काँग्रेसने साधू संतांना त्रास देणं बंद करा; साध्वी प्रज्ञा

-बारामतीत सुप्रिया सुळे पराभूत होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा विश्वास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या