Top News

…तर आज काश्मिरी तरुण IAS आणि IPS अधिकारी असते- अमित शहा

दिल्ली | 370 कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं. या विधेयकाबाबत सुरू असलेल्या चर्चेवेळी विरोधकांनी अमित शहांना अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना जम्मू काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा दिला जाईल, असं अमित शहा म्हणाले. त्यानंतर लोकसभेत विधेयकाला मंजूरी देण्यात आली.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काश्मीरमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होण्यास सुरूवात झाली. काश्मिरी तरुणांना देशाच्या नागरी सेवेत येण्याचा अधिकार नाही का?, जर शाळा जाळल्या नसत्या, तर काश्मिरी तरुण आज IAS आणि IPS असते, असं म्हणत अमित शहांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

लोकसभेत असुदुद्दीन ओवैसींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओवैसीजी अधिकाऱ्यांचंही हिंदू-मुस्लीम असं विभाजन करत आहेत. एक मुस्लिम अधिकारी हिंदू जनतेची आणि हिंदू अधिकारी मुस्लिम जनेतेची सेवा करू शकत नाही का? अधिकाऱ्यांचीही हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करता आणि स्वतः सेक्युलर म्हणवून घेता, अशी टीका अमित शहा यांनी ओवैसींवर केली.

दरम्यान, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अमित शहा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. दोन निशाण, दोन संविधान आणि दोन पंतप्रधान चालणार नाही, असं वचन आम्ही 1950 पासून दिलं होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर ते पूर्ण केलं. एकही गोळी न चालवता जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. जे सदस्य आणि सरपंच बनले आहेत ते लवकरच आमदार म्हणून निवडून येतील, असं म्हणतं अमित शहांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

थोडक्यात बातम्या –

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच- शरद पवार

पुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याबाबत नितीन गडकरी यांची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

“धर्म परिवर्तन करणाऱ्या दलितांना राजकीय आरक्षण मिळणार नाही”

लाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे-पाटील

“…तर मग आम्हाला आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या