…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली ठाकरेंची इज्जत

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray l लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी वसईच्या सनसिटी मैदानात सभा घेतली. या सभेदरम्यान अमित शहा यांनी काँग्रेस पक्षासह उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? :

दहशतवादी कसाबला पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी हातमिळवणी केली असून ते काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. असे करताना उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? अशा शब्दांत अमित शहा यांनी हल्लाबोल केला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विवेक पंडित, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार राजेंद्र गावित यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

सभेदरम्यान अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खऱ्या शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री असा केला. पाकिस्तानने आजवर भारतात बऱ्याच वेळा हल्ले केले. मात्र पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे काम देखील केले आहे. तसेच शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होऊ शकत नाहीत आणि झाले तरीदेखील पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ शकत नाहीत, असे शहा म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray l अमित शहांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल :

अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मतपेढी कमी होईल या भीतीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण असताना देखील शरद पवार, सुप्रिया सुळे राम मंदिर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत, असा आरोप अमित शहा यांनी केला आहे.

महाविकास आघाडीला देशाची चिंता नाही. सोनिया गांधी या केवळ आपल्या मुलाला म्हणजेच राहील गांधींना पंतप्रधान करण्याची स्वप्ने पाहत आहेत. दुसरीकडे शरद पवार हे सुप्रिया सुळेंना, उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंना, लालूप्रसाद यादव आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्याच्या पर्यटन करत आहेत. मात्र केवळ नरेंद्र मोदी हेच देशाच्या विकासासाठी धडपडत आहेत असेही अमित शहा म्हणाले आहेत.

News Title – Amit Shah Attack On Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

येत्या काही दिवसांत या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळणार

पावसाचं रौद्ररुप! अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

“…असे लोक पुन्हा निवडून यायला नको”; अण्णा हजारे केजरीवालांवर संतापले

बायकोचा राग काढला पोलिसांवर; पुणे शहरात एकच खळबळ

“मला मतदान करु दिले नाही, कारण…”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .