मुंबई | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. पण मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. फोनवरुन त्यांनी याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
वांद्र्यात जी गर्दी झाली होती असे प्रकार घडणं म्हणजे कोरोनाविरोधातली लढाई कमकुवत होणं. अशा प्रकारचे कोणतेही प्रकार घडू नयेत म्हणून तुमच्या पाठिशी आम्ही असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला.
आज वांद्र्यात जे काही घडलं ते काही लोकांनी पिल्लू सोडल्यामुळे घडलं असेल. त्यामुळे अनेकांना वाटलं असेल की आजपासून ट्रेन सुरु होतील आणि आपल्याला घरी जाताल येईल. पण मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की तुम्ही घाबरुन जाऊ नका आणि मुंबई सोडू नका, असं उद्धव ठाकरे संबोधताना म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनच्या सूचना दिल्या. मात्र मुंबईतील वांद्र्यात घडलेल्या प्रकारामुळे कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
बाबासाहेबांना वंदन करताना खास करुन भीमसैनिकांना धन्यवाद- उद्वव ठाकरे
मोदींनी वाढवलेल्या लॉकडाऊनला विरोध, गावी जाण्याच्या हट्टापायी हजारोंची गर्दी
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदींनी सांगितली सप्तपदी… नागरिकांना सूचना पाळत साथ देण्याचं केलं आवाहन
देशभरातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
अन्य देशांच्या तुलनेत भारताने लवकर पावलं उचलली म्हणूनच भारत मोठ्या संकटापासून वाचला- नरेंद्र मोदी
Comments are closed.