कोलकाता | राज्यातील लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला एक संधी द्या, असं आवाहन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. ते मंगळवारी पश्चिम बंगाल येथे एका सभेत बोलत होते.
तुम्ही काँग्रेस, डाव्या आणि तृणमूल काँग्रेसला संधी दिली. पण राज्यात चांगलं काय झालं? भाजपला पश्चिम बंगालमध्ये बदल घडवायचा आहे. त्यासाठी भाजपला एक संधी द्या, असंही ते बोलत होते.
55 हजार बंद झालेल्या किती कंपन्या तुम्ही सुरु केल्या, असा सवाल शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विचारला आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या सरकारला मुळापासून उपटून टाकण्याचं राज्यातील जनतेने ठरवलं आहे, असंही शहांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–राष्ट्रवादीची उमेदवारी उदयनराजेंना मिळणार; अजित पवारांनी दिले संकेत
-पंतप्रधान मोदी म्हणाले तुमचा मुलगा पबजी खेळतो का?
-“भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू”
–प्रकाश आंबेडकरांना सोलापुरची जागा देण्यास काँग्रेसचा नकार??
–लवकर बरं व्हा! राहुल गांधींनी मनोहर पर्रिकरांना दिल्या शुभेच्छा