बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमित शहांना जेलमध्ये टाकलं, नरेंद्र मोदींचा छळ केला तेव्हा आम्ही असेच आरोप केले होते का?”

अहमदनगर |  गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा सुडबुद्धीने वापर करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरून आता भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या काळात भाजपच्या नेत्यांचा छळ करण्यात आला, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

भाजपच्या लोकांना ईडीचा आणि सीबीआयचा त्रास झाला नाही, असा तुमचा आरोप आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून त्यांना किती त्रास झाला याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना नाही का?, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे. अमित शहांना जेलमध्ये टाकलं, नरेंद्र मोदींचा छळ केला तेव्हा आम्ही असेच आरोप केले होते का?, अशा प्रश्नांची सरबत्ती रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

सीबीआय चौकशी केल्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा बाहेर आले तेव्हा पत्रकारांना फक्त नमस्कार करून निघून गेले. मात्र, नवाब मलिकांना पकडल्यानंतर त्यांनी फारच बहाद्दुरकी केल्यासारखा हात वर केला होता. ही काय वागण्याची पद्धत झाली का?, असाही सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून त्यांना त्रास झाला, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सध्या बिलकुल सुडाचे राजकारण सुरू नाही. राज्यात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी राज्यातले सरकार आरोप करत आहे. ज्या काही राज्यातल्या योजना आहेत त्या तुम्ही सुरू करा. मात्र, हे योजना बंद करणारे सरकार आहे, अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असतात हे कायम लक्षाच ठेवा”

…म्हणून ‘या’ टेनिसपटूला आपल्या एक्स गर्लफ्रेंडला दरमहा द्यावे लागणार दीड लाख रूपये

‘मला काम मिळत नव्हतं म्हणून मी…’, पूनम पांडेने कबूल केली ‘ती’ मोठी चूक

मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा, आता अमित ठाकरे…

डोळ्यांचा पांढरा भाग लाल होत असेल तर दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More