महाराष्ट्र मुंबई

मुलीला दिलेलं वचन अमित शहांनी पाळलं- कंगणा राणावत

मुंबई | अभिनेत्री कंगणा राणावतला केंद्र सरकारने वाय सुरक्षा दिली आहे. कंगणानेही तशी मागणी केली होती. केंद्र सरकारने दिलेल्या सुरक्षेवर कंगणाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

देशभक्तीचा कुठलाही आवाज फॅसिस्ट दडपू शकत नाही. मी अमित शहांची आभारी आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अमित शहा मला काही दिवसांनी मुंबईला जाण्याचा सल्ला देऊ शकत होते. पण त्यांनी भारताच्या एका मुलीला दिलेल्या वचनाचा मान राखला, असं म्हणत कंगणाने शहा यांचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारचा कंगणाला वाय सुरक्षा देण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र हा फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नसून भाजपसह जनतेचाही आहे त्यामुळे  महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान करणाऱ्यांचा सर्व पक्षांंनी निषेध करायला पाहिजे असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कंगणा आणि शिवसेनेचा सध्या संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन दिवसांनी म्हणजेच कंगणा 9 सप्टेंबरला मुंबईत आल्यावर शिवसेना काय पाऊल उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तोपर्यंत दिड शहाणीला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, तिची सर्व मालमत्ता सील करा- विद्या चव्हाण

पोरीनं बाप गमावला, मात्र महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा व्हिडीओ बनवला!

राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

पुण्यात कोरोनाचं थैमान थांबेना; गेल्या २४ तासातील आकडेवारीही चिंताजनक

करणी सेनेचा कंगणा राणावतला पाठिंबा; कंगणाच्या सुरक्षेसाठी सदस्य विमानतळावर उपस्थित राहणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या