बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमित शहा म्हणजे ‘गजनी’, भाजपला गजनीसारखा झटका येतो”

रायगड | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तब्बल साडेतीन तास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली होती. त्याचवेळी पुणे दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अमित शहांवर निशाणा साधला आहे.

मैने एसे कही नही बोला था, हा गजनीचा झटका भाजपला येतो. अमित शहा गजनी असेल, पण उद्धवजी हे रामशास्त्री बाण्यासारखं काम करणारे आमचे नेतृत्व आहे, हे लक्षात ठेवा, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

माथेरानच्या नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाने भारतीय कामगार सेनेच्या युनियनमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमात अरविंद सावंत यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अरविंद सावंत यांनी भाजपवर केलेल्या वक्तव्यामुळे आता सेना भाजप युतीच्या चर्चा थांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपली संपूर्ण ताकत लावताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

आईच्या मृत्यूनंतर मुलांनी वडिलांसोबत मिळून बनवलं आईचं मंदिर!

“भरकटलेली वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना नेमकं कुठं जायचं आहे?”

“भाजपने मनसेशी युती करावी, त्यांना निवडणुकीत फायदा होईल”

पायातून रक्त वाहत असताना देखील CSKचा ‘हा’ खेळाडू खेळतच राहिला, फोटो व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More