मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजेक्शन दिल्यामुळेच राहुल गांधी आता बोलायला लागले आहेत, असं भाजपाध्यक्ष अमित शहांनी म्हटलंय. ते भाजपच्या महामेळाव्यात बोलत होते.
राहुलबाबा आमच्याकडे 3 वर्षांचा हिशेब मागतात. मात्र त्यांच्या चार पिढ्यांनी काय केलं? त्यांचा हिशोब त्यांनी आधी द्यावा, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला.
पूर आल्यावर लहान-मोठी झुडपं वाहून जातात. एकच वटवृक्ष उभं टिकतो, त्यावर पाण्याच्या भीतीने सांप, मुंगूस, कुत्रे, मांजरं सगळेच आसरा घेतात. तसे मोदी लाटेसमोर सर्वजण एकवटले आहेत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
- शिवाजी पार्क अर्धं भरलं तरी लोक विराट सभेची वल्गना करतात!
- गोपिनाथ मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा भाजपच्या महाअधिवेशनात राडा
- पाकिस्तान सुपर लीग लयभारी, आयपीएल भंगार- आफ्रिदी
- सलमाननं जेवण नाकारलं, उपाशीपोटी 4 चादरी घेऊन झोपला
- संतप्त मुंबईकरांनी भाजप महामेळाव्याला जाणाऱ्या बस रोखल्या
Comments are closed.