बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कृषी कायदे रद्द करण्यामागे काय हेतू होता?, अमित शहा म्हणतात…

नवी दिल्ली | देशात कृषी कायदे पारित केल्यानंतर शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. तसेच गेल्या तब्बल वर्षभरापासुन शेतकरी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाने हिंसक वळण प्राप्त केल्याचंही पाहायला मिळालं. अखेर शेतकऱ्यांसमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं आहे. त्यातच आता हा निर्णय घेण्यामागे नेमका काय हेतू होता?, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्पष्ट केलं आहे.

कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रीया उमटताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रीया व्यक्त करत असताना कृषी कायदे रद्द करण्यामागचा हेतू हा भारतीयांचं कल्याण करणे हा एवढाच होता, असं म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी गुरूनानक जयंती हा पवित्र दिवस कृषी कायदे रद्द करण्यासाठी निवडला तसेच कृषी कायदे रद्द करून त्यांनी हे सिद्ध केलं की, भारतीयांचं कल्याण हा एकमेव हेतू या मागे होता. तसेच त्यांच्या कृतीतून ते स्पष्टपणे दिसून येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलत असताना अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुकही केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत उत्तम निर्णय घेतला आहे, असं अमित शाह यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. तसेच मोदी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे केंद्र सरकार शेतकरी कल्याणासाठी सतत कार्यरत राहणार आहे, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनामुळे संपुर्ण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. ते कायदे मागे घेतल्याने शेतकरी संघटना व शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

भारतातील पेट्रोल-डिझेल आता अमेरिका स्वस्त करणार?; काय आहे नवा प्लॅन?

18 वर्षांवरील सर्वांनाच बुस्टर डोस देण्याबाबत ‘या’ सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला संधी

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडणाऱ्या उमेदवाराला शिवसेना देणार मोठं गिफ्ट?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More