Top News देश

“दिल्लीतील हिंसाचाराला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनाच्या आड करण्यात आलेल्या हिंसाचारासाठी सरळ-सरळ गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, असं काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटलंय.

अमित शहा यांच्या आदेशावरुनच दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलनातील शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृतीतून भाजप सरकारचाच हा डाव असल्याचं सिद्ध होतं, असं रणदीप सिंह सुरजेवाला म्हणालेत.

अमित शहा यांना दिल्लीची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयश आलंय. त्यामुळे मोदी सरकारने अमित शहांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली आहे.

अमित शहा यांना एक क्षणही आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तात्काळ बरखास्त करण्यात यावं, असं सुरजेवाला म्हणालेत.

 

थोडक्यात बातम्या-

विराट कोहलीला केरळ उच्च न्यायालयाचा दणका; पाहा काय आहे प्रकरण…

‘…तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का’; राष्ट्रवादीचा शेलारांवर पलटवार

‘गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा’; अजित पवारांच्या बापटांना कोपरखळ्या!

‘अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन’; ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप

“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या