देश

पंतप्रधानपदावर डोळा असणाऱ्यांची स्वप्ने 23 तारखेला भंगतील- अमित शहा

नवी दिल्ली | पंतप्रधानपदावर डोळा असणाऱ्या सगळ्या नेत्यांची स्वप्ने 23 मे रोजी भंगतील, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते ‘न्यूज18 इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होईल, असं ते म्हणाले आहेत.

भाजप सरकारने 5 वर्षात 22 कोटी लोकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवल्या आहेत. त्यामुळे सामान्य जनता भाजपच्या पाठीशी उभी आहे, असं ते म्हणाले आहेत.

भाजप नुसत्या घोषणा देऊन थांबलेला नाही तर जनतेच्या दारापर्यंत योजनांचा लाभ पुरवला आहे, असं अमित शहा म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-भारतीय नसल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगात जाईन; राहुल गांधींचे आव्हान

-निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपातीपणाची; राहुल गांधींचा आरोप

-ममता जी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत- सुषमा स्वराज

-मुंबईचा तडाखा; चेन्नईला पराभूत करत पाचव्यांदा अंतिम फेरीत

-राजीव गांधींवरील वक्तव्याप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या