बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पीछे हटो पीछे…’; दीप प्रज्वलन करताना फोटोसाठी पुढे आलेल्या बाबूल सुप्रियोंवर अमित शहा भडकले, पाहा व्हिडीओ

कोलकाता |  सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. एखादा सामान्य माणूस सोशल मीडियामुळे एका दिवसात प्रसिद्ध होत असतो तर काही नेत्यांची याच सोशल मीडियामुळे कोंडी होताना दिसते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांना फटकारलेलं दिसत आहे.

अमित शहा सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. एका ठिकाणी सभेच्या कार्यक्रमात ते दीप प्रज्वलन करत होते. त्यावेळी हवा जास्त असल्याने भाजप नेते बाबूल सुप्रियो यांनी पुढे येऊन दिव्याच्या बाजूला हात लावला. पण हे अमित शहा यांना काही पटला नाही. त्यांंनी लगेच सुप्रियो यांना बोट दाखवत मागे होण्यास सांगितलं. त्यानंतर सुप्रियो लगेच अमित शहांचा आदेश मान्य करत मागे जाऊन उभे राहिले.

यावेळी तिथे अनेक फोटोग्राफर आणि माध्यमांचे व्हिडीओ जर्नलिस्ट उपस्थित होते. अमित शहा आणि कॅमेराच्यामध्ये सुप्रियो यांनी मध्यस्थी केल्याने अमित शहांनी त्यांना फटकारलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी व्हिडीओ शेअर करत सुप्रियो यांची खिल्ली उडवली आहे. तर झालेल्या प्रकारामुळे बाबूल सुप्रियो नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, अमित शहा बंगालमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. तर त्यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रचारसभा रंगवताना दिसत आहे. भाजपने त्यांचे सर्व मंत्री आणि इतरही राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारासाठी बंगालला धाडले आहेत. त्यामुळे यंदाची ही निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पाहा व्हिडीओ –

 

Shree

थोडक्यात बातम्या-

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल!

‘…तर तो सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे’; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

मोठी बातमी! महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट

मुख्यमंत्र्यांनी ‘दूध का दूध पानी का पानी’ करावं- अनिल देशमुख

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीबाबत पुणे महापालिकेेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More