बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुणी ख्रिसमस तर कुणी रमजान साजरा करा, पण दुर्गा पुजेवरही बंधनं येता कामा नये”

कोलकाता | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजताचं सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. आता पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवसच उरले आहेत. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना बंगालमध्ये रंगत असल्याचं दिसून येत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. तसेच बंगालमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मेदिनीपुर येथे प्रचारार्थ आले असताना त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेच्या अपेक्षेनुसार व इच्छेनुसार संकल्पपत्र बनवल्याचं सांगितलं आहे. तसेच सोनार बांगलाची संकल्पना घेऊनच आम्ही निवडणूकीत उतरलो असल्याच त्यांनी स्पष्ट केलं. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत भाजपकडून धार्मिक ध्रुवीकरण होत असल्याच्या आरोपासंदर्भात अमित शहा यांनी जनतेच्या मनातील प्रश्न उठवणे म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण आहे, ही नवीनच व्याख्या मी ऐकत असल्याचं बोलून दाखवलं.

कुणी ख्रिसमस साजरा करावा तर कुणी रमजान साजरा करावा, आमचा कोणालाही विरोध नाही, पण सरस्वती पुजा आणि दुर्गा पुजा यांच्यावरही बंधनं यायला नाही पाहिजे. अशा शब्दात अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बंगालमध्ये दुर्गापूजा व्हायला हवी ही आमची भूमिका आहे. त्यावर तुम्ही बंधन घालता, तुम्ही ती पूजा थांबवता, मग हे धार्मिक ध्रुवीकरण नाही का? असा प्रश्‍नही त्यांनी या माध्यमातून ममता बॅनर्जी यांना विचारला आहे.

अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना आपला मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करा. म्हणजे सत्य जगासमोर येईल असा टोलाही लगावला आहे. तसेच आपल्या रोड-शो दरम्यान अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडतय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“होय ती व्होल्वो गाडी माझीच, पण मी सचिन वाझेंना कधी पाहिलंच नाही, ना कधी भेटलो” – मनिष भतिजा

इंग्लंड विरुद्ध सामन्यात विक्रमी खेळीनंतर वडिलांच्या आठवणीत भावुक झाला कृणाल पांड्या, पाहा व्हिडिओ

पहिल्याच ODI सामन्यात इंग्लंड संघाचा धुव्वा उडवत प्रसिद्ध कृष्णा आणि कृणाल पांड्याची धमाकेदार खेळी

“चित्रा वाघ आणि नवनीत राणांवर टीका करण्याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण करावं” – तृप्ती देसाई

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More