Top News महाराष्ट्र सिंधुदुर्ग

“राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीती आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही”

सिंधुदुर्ग | भाजप नेते नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे, असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला अमित शहा आले होते. यावेळी अमित शहा बोलत होते.

मला काही पत्रकार प्रश्न विचारतात तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर?, मी सांगितलं आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे, असंही शहा म्हणाले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात- देवेंद्र फडणवीस

“सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांची पोरगी करत नाही”

‘किती चाटूकरिता कराल मुस्लिम मतांसाठी?’; अतुल भातखळकरांची पवारांवर टीका

“कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणं हे गंभीर गैरवर्तन आहे”

कधीकाळी कोहलीसाठी केलेल्या त्या ट्विटमुळं अमिताभ बच्चन यांच्यावर ओढवली नामुष्की!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या