Top News महाराष्ट्र मुंबई

अमित शहांना कोरोनाची लागण, जितेंद्र आव्हाड ट्विट करून म्हणाले…

मुंबई |  केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: ट्विट करून त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर मी टेस्ट केली असता माझा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे. अमित शहांना कोरोनाची लागण झाली हे कळताच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून शहांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Amit Shah Tested Corona Positive After Jitendra Awhad Tweet)

अमित शहांना कोरोरोनाची लागण झाली आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात भरती केलं गेलं आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशा माझ्या जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या आहेत. (Amit Shah Tested Corona Positive After Jitendra Awhad Tweet)

 

 

तत्पूर्वी कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत, असं ट्विट अमित शहांनी केलंय. (Amit Shah Tested Corona Positive After Jitendra Awhad Tweet)

अमित शहांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं कळताच देशातील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी तसंच कलाकारांनी अमित शहांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

अमित शहांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच उदयनराजेंचं ट्विट, म्हणाले…

“राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले 1 कोटी गेले कुठे?; शिवसेनेचा एक पैसाही आला नाही”

बिग बींची कोरोनावर मात, अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या