अमित शाह महाराष्ट्रात जादूची कांडी फिरवणार? ‘इतक्या’ सभा घेणार

Amit Shah

Amit Shah l महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कारण यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये चुरस होणार आहे. अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संपूर्ण तयारीसह भाजप पक्ष विधानसभेला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आता भाजप पक्ष महाराष्ट्रात तब्बल 100 सभा घेणार आहे.

महाराष्ट्रात फडणवीसांसह गडकरींवर मोठी जबाबदारी :

विधानसभा निवडणुकीत भाजपचे बडे नेते प्रचारसभा घेणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे अनेक बडे नेते जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे भाजपकडून 100 हून अधिक सभा घेणार आहेत. तर विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई-कोकण आणि मराठवाड्यात एकूण 8 सभा पार घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात तब्बल 8 दिवस सभा पार पडणार आहेत. तसेच 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान मोदी महाराष्ट्रात सभा घे आर आहेत. निवडणुकीच्या या काळात ते मोठ्या प्रमाणात आश्वासन देखील देण्याची शक्यता आहे.

Amit Shah l कोण किती सभा घेणार? :

महाराष्ट्रात मोदींसह अमित शाह देखील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दुप्पट सभा गृहमंत्री अमित शाह हे राज्यात घेणार आहेत. यावेळी अमित शाह हे तब्ब्ल 20 सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आता या सभांच्या तारखांची यादी अद्याप समोर आलेली नाही.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 8, अमित शाह 20, नितीन गडकरी 40, देवेंद्र फडणवीस 50, चंद्रशेखर बावनकुळे 40 तर योगी आदित्यनाथ हे 15 सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

News Title – Amit Shah will hold a meeting in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

मनसेला निवडणूक आयोगाकडून सर्वात मोठा धक्का!

पालघरमध्ये मोठा राजकीय ड्रामा, आता संपूर्ण वनगा कुटुंब बेपत्ता

नरक चतुर्दशीला करा ‘हे’ काम, जीवनात सुख-समृद्धीसह येईल भरभराट!

लाडकी बहीण योजना बंद…’या’ नेत्यानी केला मोठा दावा?

नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार! पाहा सुट्ट्यांची यादी

 

 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .