कानपूर | केंद्रात महाआघाडी सत्तेवर आल्यास देशाचा पंतप्रधान दररोज बदलला जाईल आणि रविवारी संपूर्ण देश सुट्टीवर जाईल, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. ते कानपूर येथे बुथ कार्यकर्त्यांच्या सभेत बोलत होते.
महाआघाडी सत्तेत आल्यास सोमवारी मायावती पंंतप्रधान असतील, तर मंगळवारी अखिलेश यादव, बुधवारी ममता बॅनर्जी, गुरुवारी शरद पवार, शुक्रवारी देवेगौडा, शनिवारी स्टॅलिन हे पंतप्रधान असतील, अशा शब्दात अमित शहा यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे.
दहशतवाद संपवण्याची ताकद महाआघाडीच्या नेत्यांमध्ये आहे का? असा सवाल देखील अमित शहांनी विचारला आहे
दरम्यान, नरेंद्र मोदी हेच एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
–“राहुल गांधी देशातील पुरुषांना फ्री सेक्सचंही आश्वासन देतील”
-मनसे-राष्ट्रवादी एकत्र येणार का?, वाचा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
-“नरेंद्र मोदींच्या अपयशाच्या बातम्या चीनमध्येही छापून येतात”
–लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले
–काँग्रेस, राष्ट्रवादी एक पाऊल पुढे, प्रकाश आंबेडकरांना 6 जागा सोडण्याची तयारी?