“एरवी एकमेकांचे ‘चेहरे’ न पाहणारे महाआघाडी करतायेत”

नवी दिल्ली |  एरवी एकमेकांचे चेहरेही न पाहणारे आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडी करतायेत, अशा शब्दात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्याचे विरोधकांचे प्रयत्न चालू आहेत त्यावर अमित शहा यांनी सडकून टीका केली आहे.

या सगळ्यांनी आघाडी करू द्या.. आपण हे लक्षात ठेवा, की आपण यांना 2014 च्या निवडणुकीत पराभूत केलं आहे, असा सल्लाही अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

दरम्यान, राजधानी नवी दिल्ली येथे आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन चालू आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“सेहगल यांना न बोलावल्यानं महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं”

-…तर पुन्हा बॅट हातात घेणार नाही- विराट कोहली

-नरेंद्र मोदी स्वत:ची तुलना वाजपेयींशी करतात ही मोठी शोकांतिका- एम.के.स्टॅलिन

-CBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत

-दुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद