बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजकारणात काहीही सहन करा, पण धोका सहन करू नका”

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला.

आपल्या सगळ्यांना माहितेय की उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिलाय. राजकारणात काहीही सहन करा, धोका सहन करू नका, धोका देणाऱ्या गद्दारांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, असं अमित शहा यावेळी म्हणालेत.

जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे, असं अमित शहा म्हणालेत. तसेच भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटलं नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचं सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं.

महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अश्यात केंद्रीय अमित शहा यांचा हा दौरा महत्वपूर्ण आहे. मुंबई महापलिकेची निवडणूक डोळ्या समोर ठेवून पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.

“मुंबईत वर्चस्व केवळ भाजपचं असावं, उद्धव ठाकरेंना…”

“ज्यांच्यासोबत आमचं 25 वर्ष लफडं, त्यांनाच आम्ही आय लव्ह यू म्हटलो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More