बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आशा आहे 2 मेपर्यंत पाय ठीक होईल, निदान राजीनामा देण्यासाठी तरी चालत जाता येईल- अमित शहा

कोलकात | आशा आहे की 2 मेपर्यंत दीदींच्या पायाला झालेली दुखापत ठीक होईल. जेणेकरुन राज्यपालांकडे आपला राजीनामा देण्यासाठी त्या पायी जाऊ शकतील, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लगावला आहे.

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत झालेल्या पाच टप्प्यातील मतदानामध्ये भाजप 122 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा दावा अमित शहांनी केला आहे. पूर्व बर्द्धमान जिल्ह्यातील एका रॅलीदरम्यान अमित शहा बोलत होते. यावेळी बोलताना अमित शहांनी ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली आहे.

पश्चिम बंगालमधील पाच टप्प्यांच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हताश झाल्या आहेत कारण 122 हून अधिक जागांवर भाजप त्यांच्या पुढे आहे. भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारी नंदीग्राममध्ये निवडून येतील. बॅनर्जी यांचं स्थान पाहता त्यांना मोठ्या पराभवानं परत पाठवणं गरजेचं आहे, असं अमित शहा म्हणालेत.

दरम्यान,पाच राज्यांतील निवडणुकांपैकी सर्वाधिक चर्चा आहे ती पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांची. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून अनेकांनी बंगालमध्ये तळ ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

केंद्र सरकारवर बालीश आरोप करणं बंद करा आणि कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या- चंद्रकांत पाटील

“बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करत आहे”

“…नाहीतर स्वतःला मर्द म्हणणं तरी बंद करा”

देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत अमित शहा यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

‘मुंबईत लोक मरत आहेत आणि तुम्ही आयपीएल काय खेळताय?’; राखी सावंत भडकली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More