नवी दिल्ली | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या राफेलच्या पुजेनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही, असं म्हटलं. यावरून केंद्रीय मंत्री अमित शहांनी खर्गेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
राफेलच्या पूजेचा तमाशा करण्याची काय गरज होती, असं वक्तव्य खर्गे यांनी केलं. मात्र यात त्यांचा काही दोष नाही. खर्गेंना भारताच्या संस्कृतीवर नाही तर इटलीच्या संस्कृतीवर जास्त प्रेम आहे, अशा शब्दांत अमित शहांनी खर्गेंना सुनावलं आहे.
शस्त्रपूजा कधी तमाशा होऊ शकत नाही. देशात याची जुनी परंपरा आहे. मात्र अडचण अशी आहे की खर्गेजी नास्तिक आहे. पण काँग्रेसमध्ये सर्वच नास्तिक नाहीत, असं म्हणत काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी खर्गेंना घरचा अहेर दिला.
दरम्यान, जेव्हा आम्ही बोफर्स तोफ भारतात आणली तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता, असही खर्गें म्हणाले मात्र खर्गेजी आम्हाला बोफर्स घोटाळ्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, असा टोला भाजपने लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“लंकेच्या सोन्याच्या विटा…पण तुमच्या काय कामाच्या, आता ‘राम’राज्य पाहिजे” https://t.co/saY8LTt9QW @ChitraKWagh @RohitPawarSpeak
— थोडक्यात (@thodkyaat) October 10, 2019
…मग तरीही भाजपनं माझं तिकीट का कापलं असावं?- विनोद तावडे- https://t.co/vvndNspDRE #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 10, 2019
भाजपला घालवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही- शरद पवार –https://t.co/rfMYdu7S03 @PawarSpeaks @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 10, 2019
Comments are closed.