सिंधुदुर्ग | बाळसााहेबांचे विचार तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेच्या लालसेपोटी सत्तेत आली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर केली आहे.
नारायण राणे यांच्या रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अमित शहा बोलत होते.
शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली आहे, असं अमित शहा म्हणाले.
दरम्यान, आम्ही मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेला कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचंही अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शेतकरी आंदोलनावर मिया खलीफाचं पुन्हा ट्विट, म्हणाली…
“वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?”
मृत्यूच्या दाढेतून त्याला जवानांनी सुखरुप बाहेर काढलं, पाहा व्हीडिओ
…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही- अजित पवार
अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…