Loading...

अमित शहांकडून सीआरपीएफ जवानांना दिवाळीचं मोठं गिफ्ट!

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे. जवानांना दरवर्षी किमान शंभर दिवस आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, अशा प्रकारे नियुक्ती करण्याचे आदेश सीआरपीएफ आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना देण्यात आले आहेत.

जवानांना सध्या आपल्या कुटुंबासोबत 70 ते 80 दिवसांचा वेळ घालवता येतो. यामध्ये 60 पगारी रजा आणि पंधरा कॅज्युअल लीव्ह्स असतात. शहा यांनी दिलेल्या आदेशामुळे जवानांना त्यांच्या कुटुंबासोबत आणखी वेळ घालवता येणार आहे.

Loading...

या निर्णयामुळे जवानांमध्ये सरकार आपल्याबद्दल विचार करत असल्याची भावना निर्माण होईल, असं मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर गृह मंत्रालयाने दिलेल्या या गिफ्टमुळे सीआरपीएफ जवानांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...