अमित शहांचं आणखी एक मोठं पाऊल, इथं जाऊन स्वतः फडकवणार तिरंगा

अमित शहांचं आणखी एक मोठं पाऊल, इथं जाऊन स्वतः फडकवणार तिरंगा

नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमध्ये गृहमंत्री अमित शहा पुन्हा इतिहास घडवायला सज्ज झाले आहेत. श्रीनगरच्या लाल चौकात ते उद्या तिरंगा फडकावणार आहेत. शहांच्या काश्मीर दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या काश्मीर खोऱ्याच्या दौऱ्यावर असून तेथिल परिस्थितीचा आढावा घेत आहेत. स्वातंत्र्यदिनी ते श्रीनगरमधील लाल चौकात उपस्थित राहणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवणं अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी आणि अविस्मरणीय घटना ठरेल.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घेण्यासाठी मोदी-शहा मास्टरप्लॅन आखत आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. लवकरच यासंबंधी ते ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त ईडीची भीती- रामदास फुटाणे

-राट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्त भागात स्वातंत्र्यदिन साजरा करणार

-सुषमाजींनी ‘प्रोटोकाॅल’ला ‘पीपल्स काॅल’मध्ये बदललं- नरेंद्र मोदी

-सुषमा स्वराज यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं; नरेंद्र मोदी भावूक

-मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेच्या वेळापत्रकात पूरस्थितीमुळे बदल

Google+ Linkedin