बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् त्याचवेळी अमित शहांचा प्लॅन ठरला… महाराजांना भाजपात आणायचं!

नवी दिल्ली |  काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडत पक्षातल्या आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पण त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय का घेतला? ते या निर्णयापर्यंत कधी आणि कसे पोहचले? असा प्रश्न सध्या चर्चिला जातोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, शिवराज सिंह चौहान, पियुष गोयल हे सगळे भाजप नेते भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान रिसेप्शन हॉलमध्येच मोदी-शहा आणि भाजप नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. आणि नड्डा कार्यक्रमात व्यस्त असल्याने अमित शहांनी ज्योतिरादित्य यांना भाजपात आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसवर ज्योतिरादित्य गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. जर आपण त्यांना भाजपात आणलं तर आपण मध्य प्रदेश हे गमावलेलं राज्य पुन्हा मिळवू शकतो, असं भाजप नेत्यांनी अमित शहांना सांगितलं. त्यावर अमित शहांनी देखील विचार केला. आणि चर्चेला पुर्णविराम देत त्यांच्या भाजपप्रवेशाला हिरवा कंदील दर्शवला.

दरम्यान, राजीनामा देण्याअगोदर शिंदे यांनी मोदी-शहा यांची भेट घेतली आहे. ते अधिकृतरित्या भाजपात आज उद्या प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जातीये. या सगळ्यामुळे इतर काँग्रेसशासित राज्यांमध्ये नाराज नेते बंड करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतीये.

ट्रेंडिंग बातम्या-

चिंता नसावी, महाराष्ट्राची ‘पाॅवर’ वेगळी आहे, मध्य प्रदेशचा वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही- संजय राऊत

मुख्यमंत्रिपद अजितदादाच सांभाळतात, खरे मुख्यमंत्री तर…- संदिप देशपांडे

महत्वाच्या बातम्या-

-शेतकऱ्यांना लॉटरी! आता मिळणार 1 लाख 60 हजार रूपयांचं बिनव्याजी कर्ज

“त्या भीतीने उद्धव ठाकरे मातोश्री सोडून वर्षा बंगल्यावर जाणार नाहीत”

MIM पाठोपाठ शिवसेनेचीही औरंगाबादची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More