भाजप टोळी नव्हे देशभक्तांची संघटना, अमित शहांचे बोल

अमित शहा

लखनऊ | उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते अधिक नम्र झाले आहेत. भाजप ही काही लोकांची टोळी न राहता देशभक्तांची संघटना झाली आहे, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं.

कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच भाजपने देशाच्या ६० टक्के भागावर वर्चस्व प्रस्तापित केले आहे, असंही त्यांनी म्हटलं. जातीयवाद आणि कुटुंबवादाचे राज्य संपवले, असं म्हणत त्यांनी समाजवादी पक्षाला टोला लगावला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या