Top News

पंतप्रधान नरेंद्र मोदी समाजसुधारक म्हणून ओळखले जातील- अमित शहा

नवी दिल्ली |  देश स्वतंत्र झाला होता. मात्र मुस्लिम महिला तिहेरी तलाक नावाच्या कुप्रथेत अडकल्या होत्या. त्यांना खऱ्या अर्थाने तिहेरी तलाक बील मंजूर करून पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र दिलं. याच कामासाठी नरेंद्र मोदी इथून पुढे समाजसुधारक म्हणून ओळखले जातील, असं वक्तव्य भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.

तिहेरी तलाक बील मंजूर झाल्याने त्यांना आता त्यांचा अधिकार मिळाला आहे. त्या मुक्तपणे आता श्वास घेत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं ऐतिहासिक काम भारताच्या पंतप्रधानांच्या इच्छेने केलं. त्याचं सारं श्रेय मोदींना जातं, अशी स्तुतीसुमने अमित शहा यांनी मोदींवर उधळली.

नरेंद्र मोदींच्या कामांनी त्यांची आता समाज सुधारकांच्या यादीत नोंद होईल, असं अमित शहा म्हणाले. तिहेरी तलाक बील मंजूर केले नसते तर तो भारतीय लोकशाहीला लागलेला डाग असता, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, तिहेरी तलाकवर बोलताना अमित शहांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

महत्वाच्या बातम्या-

-पंडित नेहरूंमुळेच गोवा मुक्तीस उशीर झाला; भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांची टीका

-….तर एक दिवस भाजपचं काँग्रेस होईल- महादेव जानकर

-काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष; या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला घरचा आहेर!

-पक्षातील नवीन चेहरे समोर आणणार; विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य

-धक्कादायक!!! मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात अ‌ॅम्बुलन्समधून अवैध दारूची वाहतूक….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या