Top News विधानसभा निवडणूक 2019

“आम्ही वारंवार फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असं सांगत होतो तेव्हा आक्षेप का नाही घेतला”

मुंबई |  अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलेला संपूर्ण देशाने पाहिला. याची परिणिती युती तुटण्यात झाली. अखेर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर भाजपाध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केलं आहे.

आम्ही वारंवार देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील असं सांगत होतो तेव्हा शिवसेनेने आक्षेप का नाही घेतला? असा सवाल त्यांनी शिवसेनेला विचारला आहे. तसंच जनतेने युतीला जनादेश देऊनही सेनेने आमच्या बरोबर सरकार स्थापन करायला नकार दिला, असं ते म्हणाले.

शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असं काहीही ठरलेलं नव्हतं असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं. तसंच निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली असा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केला आहे.

दरम्यान, बंद दाराआड शिवसेनेशी काय चर्चा झाली हे सांगणं मला योग्य वाटत नाही कारण माझ्या पक्षाचा माझ्यावर तसा संस्कार नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेशी नेमकं त्यावेळी काय बोलणं झालं होतं हे सांगणं टाळलं.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या