Amit Shah1 - अमित शहा आरोपी असलेल्या खटल्याची वार्तांकनबंदी बेकायदा
- देश

अमित शहा आरोपी असलेल्या खटल्याची वार्तांकनबंदी बेकायदा

मुंबई | सोहराबुद्दीन कथित चकमकीप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याच्या बातम्या देण्यास विशेष सीबीआय न्यायालयाने बंदी घातली होती. ही बंदी बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. 

अमित शहा आरोपी असलेल्या या प्रकरणात न्यायाधीश लोया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणातील आरोपींनी न्यायालयात धाव घेत ही वार्तांकनबंदी घालण्यात यश मिळवलं होतं. 

दरम्यान, केवळ खटल्याची सुनावनी संवेदनशील बनली आहे, त्यामुळे बातम्या देण्यावर बंदी घातली जाऊ शकत नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. तसेच हा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा