देश

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | जदयूपेक्षा भाजपच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार, अशी जाहीर घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ते सीएनएन-न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बिहार विधानसभा निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळेल. मुख्यमंत्रीपदासाठी या ठिकाणी ‘जर-तर’ असणार नाही. बिहारमध्ये नितीशकुमार हेच पुढील मुख्यमंत्री असतील, याची आम्ही सार्वजनिकरित्या घोषणा केली आहे आणि आम्ही याला बांधील आहोत, असं अमित शहांनी म्हटलं आहे.

बिहारच्या लोकांना डबल इंजिनचे सरकार मिळणार आहे. एक राज्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, असंही अमित शहा म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

‘गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू’; खासदार संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

“मी आणि माझं कुटुंब म्हणत मुख्यमंत्री मात्र घरातच बसलेत”

7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू

“बाळासाहेबांचा वारस असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या