“2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल”
नवी दिल्ली | 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत अमित शहा (Amit shaha) यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या 2024च्या निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत येणार आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं भाकीत अमित शहा यांनी केलं आहे.
आसामच्या डिब्रुगड येथे एका सभेला संबोधित करताना अमित शहा (Amit Shaha) यांनी हा दावा केला. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाही चढवला. लवकरच काँग्रेस संपूर्ण देशातून हद्दपार होईल, असा दावा अमित शहा (Amit shaha) यांनी केला आहे.
2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममधील 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवेल. तसेच 300 हून अधिक जागा जिंकून भाजप बहुमत मिळवेल. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील, असा दावा अमित शहा यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी अमित शहांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर देखील टीकास्त्र सोडलं. राहुल, आता तुम्हाला बदलावच लागेल. नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसचा सफाया होईल, असं ते म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.