देश

कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही- अमित शहा

नवी दिल्ली | हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. रिहानाच्या या ट्विटला अभिनेत्री कंगणा राणावत, अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनी प्रत्युत्तर दिलं. आता या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणताच प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही, असं अमित शहांनी म्हटलंय. अमित शहांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

आम्ही एकजुटीने प्रगतीच्या दिशेने जाऊ. कोणताच चुकीचा प्रचार भारताला प्रगतीच्या दिशेने जाण्यापासून रोखू शकत नाही, असं अमित शहांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट रिट्विट करत शेतकरी आंदोलनावरून आपण याविषयी का बोलत नाही, असं म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

शेतकरी आंदोलन : सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्विटनं एकच खळबळ

मी राज्यपाल नाही, तर…- भगतसिंह कोश्यारी

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी मिया खलिफा नेमकी कोण आहे?, पाहा फोटो

मला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या