बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ

नवी दिल्ली | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. त्यानंतर आता भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांनी अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे.  या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत झालेल्या भेटीबाबत विचारलं असता अमित शहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला. मात्र आता महाराष्ट्राकडे आमचं लक्ष आहे. कोणासोबत सरकार बनवणार ते भविष्यात कळेलच, असं अमित शहा म्हणालेत.

दरम्यान, या भेटीनंतर राज्यात येत्या काळात नवीन समीकरणं तयार होणार का? महाविकास आघाडीची सत्ता जाणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अँटिलिया, वाझे परमबीर असे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

थोडक्यात बातम्या- 

अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई

शेतकऱ्यांचा संताप अनावर; भररस्यात भाजप आमदाराचे कपडे फाडून केली मारहाण

धक्कादायक! भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

सावधान!!! महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; आज तब्बल एवढ्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरारक सामना, असा झाला भारताचा विजय!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More