बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विधानसभेला शिवसेनेबरोबर युती कायम पण मुख्यमंत्री भाजपचाच झाला पाहिजे”

मुंबई |  रविवारी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत येत्या विधानसभेला काही करा पण मुख्यमंत्री पुन्हा एकदा भाजपचाचा झाला पाहिजे, असं अमित शहांनी म्हटलं आहे.

शिवसेनेसोबतची युती विधानसभेसाठी कायम राहिल परंतू मुख्यमंत्री मात्र भाजपचाच हवा, असं अमित शहा म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावरून शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत असल्याचं बोललं जातंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांसह महत्वाचे भाजप नेते या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, फक्त आपल्या जागांवरच नव्हे तर मित्रपक्षाच्या जागेवरसुद्धा विजयासाठी चांगले प्रयत्न करा, असंही अमित शहांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

-धक्कादायक! अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या 4 आमदारांचा तरुणीसोबतचा अश्लील डान्स व्हायरल

-…म्हणून मी निवडून आलो; इम्तियाज जलील यांनी सांगितलं विजयामागचं कारण

-‘ही’ अभिनेत्री म्हणते, सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट बघण्यात रस नाही!

-‘RSS’ची विचारसरणी देशाला घातक- शरद पवार

-ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक गिरीश कर्नाड यांचे निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More